श्रीदेवीप्रमाणेच याही बॉलिवुड कलाकारांचं ह्रदयविकाराने झालं होतं अकस्मिक निधन

शनिवारी मध्यरात्री बॉलिवुड अभिनेत्री श्रीदेवी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने अकस्मिक निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्याने बॉलिवुड इंडस्ट्रीसोबतच त्यांच्या प्रचंड मोठ्या चाहत्या वर्गालाही धक्का बसला आहे. याआधीही अशाच प्रकारे अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

इंदर कुमार - अवघ्या ४५ वर्षांच्या वयात अभिनेता इंदर कुमारने या जगाचा निरोप घेतला होता. श्रीदेवी यांच्याप्रमाणेच इंदर कुमारचाही ह्रदयविकाराच्या झटक्यानेच मृत्यू झाला होता. २८ जुलै, २०१७ रोजी त्याची प्राणज्योत मालवली.

जोहरा सहगल - बॉलिवुड अभिनेत्री आणि एक उत्तम डान्सर असलेल्या जोहरा सहगल यांचाही मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानेच झाला. आयुष्यभर चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर वयाच्या १०२व्या वर्षी निधन झालं. २०१४ साली राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

देव आनंद - सदाबहार अभिनेते देव आनंद यांना ४ डिसेंबर २०११ ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं.

रीमा लागू - अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचाही ह्रदयविकारामुळेच मृत्यू ओढवला होता. २८ जुलै, २०१७ रोजी ही दुर्दैवी घटना घडली.

ओम पुरी - बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना ६६व्या वर्षी ह्रदयविकाराचा झटका आला. ६ जानेवारी २०१७ रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या