मुंबईकरांसोबतच बॉलिवूड कलाकारही अडकले

मंगळवारी मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले. मुसळधार पावसामुळे मुंबईची अक्षरश: तुंबई झाली होती. अनेक जण रेल्वे, स्टेशन्स, ऑफिस आणि रस्त्यांवर अडकले होते. यासर्वात मुंबईकर वेठीस धरला गेला होता. २६ जुलैची आठवण ताज्या करणाऱ्या पावसाने मुंबईकरांसोबतच बॉलिवूड कलाकारांचे देखील हाल केले.

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे सुद्धा मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकले होते. सांताक्रुझ भागात अनुपम खेर अडकले होते. याचा एक व्हीडिओ सुद्धा त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या परिस्थितीत अनुपम खेर यांनी त्यांच्या मित्राला कॉल केला आणि मित्राच्या घरी राहायला गेलो.

फक्त अनुपम खेरच नाही तर आर माधवन सुद्धा घराजवळच अडकला होता. त्याची कार बंद पडली होती. याचा व्हीडिओ आर माधवनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  मी माझ्या घराजवळच्या परिसरात अडकलो आहे. सर्वत्र पाणी भरले आहे आणि माझी कार सुद्धा बंद पडली आहे. किती मजेशीर आहे हे, असे माधवनने व्हीडिओत म्हटले आहे.

अभिनेत्री हुमा कुरेशी मुंबई विमानतळावर जात असताना तीन तास वाहतूककोंडीत अडकली होती. याचा फोटो देखील तीने ट्विटरवर शेअर केला. "अनेक जण या ट्रॅफिकमध्ये अडकली आहेत आणि एकमेकांना मदत करत आहेत. हीच खरी मुंबई" असा मेसेजही ट्वीट केला आहे. 

दिग्दर्शक-निर्माते महेश भट यांनी पाण्यात बुडालेल्या कारचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. माझ्या दोन बहिणी या कारमध्ये अडकल्या होत्या. त्या दोघी वेळेवर गाडीतून बाहेर आल्या म्हणून अनर्थ टळला, असे ट्वीट देखील त्यांनी केले आहे. 

यासोबतच अनेक कलाकारांनी नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन देखील केले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या