अभिनेते डॅनींच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध खलनायक म्हणून नावारुपाला आलेल्या डॅनी डेन्झोप्पा यांचा मुलगा रिनजिंग बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो 'स्क्वॉड' या अॅक्शन थ्रिलर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

डॅनी म्हणतात...

ज्येष्ठ अभिनेते आणि खलनायक अशी ओळख असलेले डॅनी यांनीही आपल्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'रिनजिंग बॉलिवूडमधून फिल्मी करियरची सुरुवात करत आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आता त्याला खूप मेहनत करायची आहे. त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल, असं डॅनी म्हणाले.

रिनजिंग म्हणाला...

स्कॉड या चित्रटाचे दिग्दर्शक कोण असणार? आणि या सिनेमात रिनजिगंची हिरोईण कोण असेल? याबबात गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र त्याची लवकरच अधिकृत घोषणा होईल, असंही रिनजिंग म्हणाला.

पुढील बातमी
इतर बातम्या