प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता इरफान खान याला सध्या एका गंभीर आजाराने ग्रासलं आहे. होय ही माहिती खुद्द इरफाननेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
इरफानच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांना जबरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानला कावीळ झाल्याचं समोर आलं होतं. इरफानचा हा पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे इरफान या आजारातून सहीसलामत बाहेर पडेल, यात शंका नाही.
इरफानने सलाम बॉम्बे, फुटपाथ, बिल्लू, पीकू, मदारी, पान सिंह तोमर, लाईफ इन मेट्रो, लाईफ ऑफ पाय, हिंदी मीडियम या चित्रपटात दर्जेदार अभिनय केलं आहे.
लवकरच इरफान प्राईम व्हिडिओ सीरिजच्या 'द मिनस्ट्री' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर तो विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदूकोणचीही महत्त्वाची भूमिका आहे. २०१८ च्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.