करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतोय. सध्या सैफ अली खान आणि करिना कपूर खान तैमुरसोबत स्वित्झर्लंड टूरला गेले आहेत. त्यांच्या ट्रिपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिना कपूर खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमुरसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तैमुर सैफच्या मांडिवर बसला आहे. तर करिना त्याच्या बाजूला बसली आहे. तैमुरचा हसरा चेहरा पाहून तुम्ही छोट्या नवाबच्या प्रेमातच पडाल.
तैमुरचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. फोटोमध्ये सैफने गोंडस तैमुरला उचलून घेतले आहे. यात सैफ अली खानने सफेद रंगाचा सूट घातला आहे. सो क्युट ना! फोटोवरून नजरच हटत नाही.
बाबांसोबत फोटो काढल्यानंतर तैमुरचा आईसोबतचा फोटो तर मस्तच आला आहे. यात तैमुरने पांढरी टोपी घातली आहे. तैमुरच्या चेहऱ्यावर गोंडस स्माईल आहे.