अजरामर गीते पोरकी झाली, भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यानं काही दिवसांआधी त्यांना आयसीयूतून नॉर्मल वॉर्डमध्ये आणण्यात आलं होतं. पण पुन्हा एकदा त्यांना त्रास जाणवू लागल्यानं शनिवारी पुन्हा आयसीयूतून दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयुत उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. त्यात ते म्हणाले की, लता मंगेशकर अमर आहेत. युग संपले. दुसऱ्या एका ट्विटमध्ये लता दीदींचा फोटो शेअर करत ते म्हणाले की, एकच सूर्य एक चंद्र, एकच लता, तेरे बिना भी क्या जीना. 

शनिवारी लता दीदींना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयात आले होते. अनेक राजकीय नेते त्यानंतर रुग्णालयात भेट देऊन गेले. त्यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.  यासोबतच रविवारी नितीन गडकरी रुग्णालयात आले होते.  

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनियाही झाला होता. 

गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. त्यामुळे काही दिवसांत त्या घरी परततील, असे वाटत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

मात्र शनिवारी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर पुन्हा अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते. सध्या त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते.


पुढील बातमी
इतर बातम्या