बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध असलेली देसी गर्ल प्रियांका चोप्राने कथित प्रियकर निक जोनस याच्यासोबत लंडनमध्ये साखरपुडा उरकला. ‘पिपल’ या मासिकाने या दोघांचा साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या मासिकेने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात 18 जुलैला प्रियांकाच्या वाढदिवशी लंडनमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला. यावेळी निकनं प्रियांकासाठी सर्वात आलिशान ब्रँडपैकी एक एसलेल्या टीफिनी ब्रँडची अंगठी खरेदी केली.
प्रियांका आणि निक हे दोघेही नुकतेच भारतातही येऊन गेले. यावेळी निक प्रियंकाच्या आईलाही भेटला. यानंतर लंडनमध्ये जाऊन या दोघांनी साखरपुडा केला. साखरपुड्यांनंतर हे दोघेही खूपच खूश दिसत आहेत.
सध्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेली प्रियांका 'भारत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होती. मात्र, आता तिनं हा सिनेमा सोडून दिला. दिग्दर्शक अली अब्बास झफर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
'एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी तिनं हा निर्णय घेतला असं यापूर्वी म्हटलं जात होतं. हा प्रोजेक्ट म्हणजे तिचं लिग्न हो ऐन वेळी तिनं आम्हाला सांगितलं. याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या संपूर्ण टीमकडून तिला खूप शुभेच्छा,' असंही अब्बासनं सांगितलं.
प्रियांका चोप्राने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही यश मिळवलं आहे.तर निक जोनस हा अभिनेत्याबरोबच प्रसिद्ध गायक देखील आहे. त्याचे अनेक अल्बमही प्रसिद्ध झालेले आहेत.