रणबीर म्हणतो 'आलिया माझी क्रश'

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • बॉलिवूड

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. पण आता खुद्द रणबीरने आलिया त्याची क्रश असल्याचं खुद्द स्वीकार केला आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे स्पष्ट केलं आहे. रणबीर सध्या संजय दत्तचा बायोपिक 'संजू'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

'हा' महान सिनेमा

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने 'आलिया आपली क्रश' असल्याचं स्वीकार केला आहे. यावेळी त्याने आलियाच्या राझी या सिनेमाचं भरभरुन कौतुकही केलं. तो म्हणाला 'राझी' हा सिनेमा भारतीय सिनेमासृष्टीतील एक महान सिनेमांपैकी एक आहे.

आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू

करण जौहरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाल्यापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उत आला. या सिनेमात दोघेही मुख्य भूमिकेत आहेत.

नुकतेच पार पडलेल्या सोनम कपूरच्या लग्नाला हे दोघेही एकत्र पोहचले. या ठिकाणीही या दोघांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फक्त रणबीरच नाही तर आलिया भट्ट ही देखील रणबीरबरोबर लग्न करू इच्छित असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. रणबीरची आई नीतू कपूरसोबत तिचे चांगले संबंध आहेत. आणि नीतू कपूर या देखील तीला पसंत करतात.

पुढील बातमी
इतर बातम्या