पाकिस्तानात 'अय्यारी'वर बंदी

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • बॉलिवूड

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी यांची भूमिका असलेला अय्यारी हा चित्रपट देशभरातल्या सिनेमागृहात नुकताच प्रदर्शित झाला. पण पाकिस्तानात मात्र या चित्रपटाला बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. आणि म्हणूनच या चित्रपट प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.

'अय्यारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलं आहे. यामध्ये मनोज वाजपेयीने सिद्धार्थ मल्होत्राच्या मेंटॉर म्हणजेच गुरूची भूमिका साकारली आहे. आणि या दोघांच्या विचारसरणीत जमीन आसमानाचा फरक आहे. अय्यारी केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला असला तरी पाकिस्तानमधील नागरिकांना हा सिनेमा बघता येणार नाही. कारण पाकिस्तानने अय्यारी हा चित्रपत्र प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारली आहे.

अय्यारीला पाकिस्तानात बंदी, ही निरज पंडीत यांच्यासाठी नवीन नाही. याआधी भारतीय सैन्यावर आधारीत बेबी आणि नाम शबाना या चित्रपटांना पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटात सिद्धार्थ आणि मनोज वाजपेयी यांच्याबरोबर अनुपम खेर, रकुल प्रीत आणि नसरूद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या