जबरा 'फॅन' चा मृत्यू

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सोमवारी रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत दाखल झाला. मुंबईच्या बॉम्बे सेंट्रल स्टेशनवरुन त्याने 5.40 ची ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस पकडली. मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदरा स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली. चाहत्यांनी रेल्वे ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी केली होती. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत फरीद खान नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. फरीद खान हा समाजवादी पक्षाचा स्थानिक नेता होता. जवळपास दीड लाख चाहत्यांनी वडोदरा स्टेशनवर गर्दी केली होती. त्याच गर्दीत गुदमरुन फरीद खान यांचा मृत्यू झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या