वरुण धवन बनला 'Mr. लेले', या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

अभिनेता वरुण धवनच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्माता शशांक खेतान आणि वरुण धवन यांची हिट जोडी पुन्हा एकदा चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'मिस्टर लेले' या नव्या विनोदी चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. वरुणनं त्याच्या सोशल मीडियावर हा पोस्टर शेअर केला आहे.

पोस्टरमध्ये वरुण धवन शर्टलेस आणि पॅन्टलेस आहे. फक्त बॉक्सर पँट त्यानं घातली आहे. त्याचे दोन्ही हात वर असून, त्याच्या एका हातात बंदूक दिसते तर दुसऱ्या हातात वरुणनं एक घड्याळ घातलं आहे. या पोस्टरकडे बघून आपल्याला जाणवते की वरुण एका दरोडेखोराची भूमिका साकारत आहे ज्याला पोलिसांनी पकडले असावे. पुढच्या वर्षी १ जानेवारी २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात वरूण धवन सोबत भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पहिल्यांदाच ही जोडी एकत्र काम करणार आहे. भूमिच्या जागी याआधी कियारा अडवाणीचा नंबर लागला होता. पण व्यस्त वेळापत्रकामुळे कियारानं चित्रपट सोडल्याचं बोलललं जातं. या दोघांसोबत जान्हवी कपूर सुद्धा चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे

वरुण धवननं २०१२ साली करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं ऑक्टोबर, हम्टी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, जुडवा २ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. आता तो पुन्हा एकदा आपली कमाल दाखवायला 'मिस्टर लेले' चित्रपटातून येतोय.  


हेही वाचा

बॉलिवूडमधील 'ही' अभिनेत्री साकारणार महिला क्रिकेटपटूची भूमिका?

पुढील बातमी
इतर बातम्या