सीकेपी बँकेच्या 99.2 टक्के ठेवीदारांना मिळणार पूर्ण पैसे

सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्यानंतर बँकेचे लाखो खातेदार हवालदील झाले आहेत. मात्र, या खातेदारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सीकेपी बँकेच्या 99.2 टक्के ठेवीदारांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता लिक्विडेशन प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे डीआयसीजीसी कायद्याअंतर्गत सीकेपी बँकेच्या खातेदारांना पैसे परत केले जातील. बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातील रकमेच्या हिशोबाने 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल.

सीकेपी बँकेत एकूण 1.32 लाख ठेवीदार आहेत. यामध्ये 99.2 टक्के ठेवीदार असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये 5 लाखांपेक्षा कमी रक्कम आहे. त्यामुळे या खातेदारांना आपली पूर्ण रक्कम मिळणार आहे. सीकेपी सहकारी बँकेबाबत आरबीआयचे सीजीएम (कम्युनिकेशन्स) योगेश दयाळ यांनी ट्वीट केलं आहे की, 'मुंबईस्थीत सीकेपी सहकारी बँक 2014 पासून आरबीआयच्या इनक्लुसिव्ह डायरेक्शन अंतर्गत आहे. रिव्हायव्हची शक्यता कमी असल्याने या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या बँकेच्या 1,32,170 ठेवीदारांपैकी 99.2 ठेवीदारांचे डीआईसीजीसी कडून पूर्ण पैसे परत करण्यात येतील. 

सीकेपी सहकारी बँकेच्या नेटवर्थमध्ये झालेली घसरण हे बँकेचा परवाना रद्द होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. बँकेची अशी परिस्थिती छोट्या आणि मध्यम स्तरावरील रियल एस्टेट डेव्हलपर्सना कर्ज दिल्यामुळे झाली आहे. बँकेचा 97 टक्के एनपीए आहे.  ऑपरेशनल फायदा होऊनही नेटवर्थमध्ये घसरण झाल्याने बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.


हेही वाचा -

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

तर, ११ लाख परप्रांतीयांना सोडण्यासाठी लागतील इतक्या ट्रेन आणि बस..


पुढील बातमी
इतर बातम्या