मुंबई - बँकेचे काही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते या दोन दिवसांतच आटोपून घ्या. कारण शनिवार ते सोमवारपर्यंत बँका बंद राहणार आहेत.
11 ते 13 मार्च बँकांना सुट्टी आहे. 11 मार्चला दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असणार आहेत. त्यानंतर रविवार आणि 13 मार्चला रंगपंचमीनिमित्त सुट्टी असल्याने बँका बंद असणार आहेत. त्यामुळे बँकेची जी काही कामे असतील ती आज आणि उद्यापर्यंत आटोपून घ्या. या तीन दिवसांत पैशांसाठी एटीएमवरच अवलंबून राहावे लागणार आहे.