आजच उरकून घ्या बँकिंग व्यवहार, बँका सलग ३ दिवस राहणार बंद

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • व्यवसाय

महत्त्वाचे बँकिंग व्यवहार करायचे असतील, तर ते आजच्या दिवसभरात करून घ्या. कारण उद्यापासून सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे गरजेच्या वेळेस तुमची पंचाईत होऊ शकते.

कारण काय?

२६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाची बँकांना सुट्टी असल्याने शुक्रवारी सरकारी आणि खासगी अशा सर्वच बँका दिवसभर बंद राहणार आहेत. त्यानंतर येणारा शनिवार चौथा शनिवार असल्याने रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे शनिवारी देखील बँकांचं कामकाज होणार नाही. तिसऱ्या दिवशी रविवार असल्याने अर्थात या दिवशीही बँका बंद राहतील. अशा प्रकारे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

इंटरनेट बँकिंग

सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने प्रामुख्याने चेक क्लिअरिंगचं काम खोळंबेल. त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्यासाठी सोमवार किंवा मंगळवारची वाट बघावी लागेल. या तीन दिवसांदरम्यान इंटरनेट बँकिंगचा एकमेव पर्याय ग्राहकांजवळ उपलब्ध असेल. त्यामुळे या तीन दिवसांत अाॅनलाईन व्यवहार केल्यास उत्तम.

एटीएममधून पैसे काढून ठेवा

बहुतेकजण सुट्ट्यांचं प्लानिक करत असल्याने त्यांनी एटीएममधून पैसे काढून ठेवावेत. कारण या तीन दिवसांमध्ये एटीएममध्येही खडखडाट होण्याची शक्यता असेल.

पुढील बातमी
इतर बातम्या