श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत आमदार लोढा अव्वल स्थानी

देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर्स आणि बांधकाम व्यवसायिकांच्या यादीमध्ये भाजपचे मुंबईतील अामदार मंगलप्रभात लोढा यंदा अव्वल स्थान पटकावलं आहे.

मंगलप्रभात यांची एकूण संपत्ती २७ हजार १५० कोटी आहे. GROHE हरून इंडिया रिअल इस्टेटनं बुधवारी ही यादी जाहीर केली. मागील वर्षी मंगलप्रभात हे या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती १८ हजार ६१० हजार कोटी रुपये होती.

श्रीमंत महिला व्यावसायिक

एम्बसी प्रॉपर्टी डेव्हलपमेंटचे जितेंद्र विरवानी यंदा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. जितेंद्र विरवानी यांची संपत्ती २३ हजार १६० कोटी आहे. गेल्यावर्षी हे तिसऱ्या स्थानावर होते. तसंच, डीएलएफचे प्रमोटर राजीव सिंग यंदा तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती १७ हजार ६९० कोटी इतकी आहे. यांच्याव्यतिरिक्त रेणुका तलवार या श्रीमंत महिला बांधकाम व्यवसायिका ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती २७८० कोटी इतकी आहे. के. पी. सिंग गेल्यावर्षी पहिल्या स्थानी होते. त्यांची संपत्ती २३ हजार ४६० कोटी इतकी होती.

शंभर जणांची यादी जाहीर

बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या श्रीमंत बिल्डर्स आणि बाधकाम व्यवसायिकांच्या या शंभर जणांच्या यादीमध्ये मुंबईचे ३५, दिल्लीचे २२ आणि बंगळूरुचे २१ व्यावसायिक आहेत. या शंभर जणांची एकुण संपत्ती २ लाख ३६ हजार ६१० कोटी रुपये आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या