मुंबईत CNG आणि PNGच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

आधीच वाढत्या महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने CNG आणि PNGच्या किंमतीत वाढ केली आहे.

सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे.

स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सांगितलं आहे.

महानगर गॅसला २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५९६.९५ कोटी रुपयांचा नफा झाला. हा नफा आधीच्या वर्षापेक्षा कमी असला तरी कंपनीच्या मिळकतीत निम्मी वाढ झाली आहे.

सीएनजी, पीएनजीच्या दरात झालेल्या भरभक्कम वाढीमुळे कंपनीच्या मिळकतीत ही वाढ झाल्याचे चित्र आहे. यातूनच १७ ऑगस्टपर्यंत कंपनीचे समभाग असलेल्या भागधारकांना १५.५० रुपये प्रति समभाग इतका लाभांशदेखील मिळणार आहे.

ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने फेब्रुवारी महिन्यातदेखील भागधारकांना १० रुपयांचा अंतरिम लाभांश दिला होता. यानुसार एकीकडे इंधन दरवाढीचा ग्राहकांच्या खिशाला फटका बसत असताना दुसरीकडे केंद्र सरकारी कंपनीकडून भागधारकांना मात्र लाभांशाचा आनंद दिला जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या