नोटाबंदीचा फटका महाविद्यालयीन महोत्सवांना

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

मुंबई - नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना हा कॉलेजमध्ये महोत्सवांनी भरलेला असतो. त्यामुळे याची तयारी सुद्धा 2 ते 3 महिन्यापासूनच सुरू असते. मात्र या महोत्सवावरही 1000-500 च्या नोटा बदलीचा फटका बसण्याची शक्यता आहे. फेस्टीव्हलच्या ऐन तोंडावर या नोटा बदलीमुळे महाविद्यालयीन मुलांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चर्चगेट येथील सिडनॅम कॉलेजचा ब्रुहाहा हा दक्षिण मुंबईतील सर्वात मोठा फेस्टीव्हल मानला जातो. मात्र या महोत्सवाचं काम पैशाअभावी रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे फेस्टीव्हलच्या तारखा पुढे ढकलल्या जावू शकतात असंही सांगण्यात येतंय.

कॉलेज फेस्टिव्हल

सेंट झेव्हिअर्स (अंत्यस) 26,27 नोव्हेंबर

सिडनँहम महाविद्यालय ( ब्रुहाहा) 9 ते 16 डिसेंबर

मिठीबाई महाविद्यालय (क्षितीज) 1 ते 3 डिसेंबर

साठ्ये महाविद्यालय (पुस्तकोत्सव) 16 ते 18 डिसेंबर

जोशी बेडेकर महाविद्यालय (गंधर्व) 22,23 जानेवारी

पुढील बातमी
इतर बातम्या