नो कॅश? नो टेन्शन...

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

धसई - एक असं गाव, जिथं ना बँकेच्या समोर रांगा लागतात ना कुणाला सुट्ट्या पैशांची चिंता... इथं दूध, भाजीपाला किंवा कुठल्याही वस्तूसाठी कुणालाच खिशातून रुपयाही काढावा लागत नाही. सगळीकडे सुट्या पैशांची टंचाई असली, तरी या गावात त्याचा काहीच त्रास होत नाहीये. कारण हे सगळं गावच कॅशलेस आहे...

छोटा-मोठा असा प्रत्येक व्यवहार इथं ऑनलाइन होतो. डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे सगळी खरेदी होते. हे शक्य झालंय दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांच्या प्रयत्नांतून...

बँक ऑफ बडोदाच्या सहकार्यानं हे गाव कॅशलेस करण्याचा उपक्रम हाती घेण्याात आला. गावातल्या रहिवाशांकडे जनधन खातं असल्यानं डेबिट कार्ड सगळ्यांकडे आहेच. मग 39 कार्ड स्वाइप मशिनसाठी अर्ज करण्यात आले. यात सहा वडा पाव विक्रेतासुद्धा आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:चं डेबिट कार्ड वापरत तांदूळ खरेदी केली आणि कॅशलेस गाव हा उपक्रम सुरू केला. या वेळी रणजीत सावरकर, बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेज सिंग, आमदार किसन कथोरे आदीही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या