रंग न जाणारी नोटच असू शकेल नकली...!

मुंबई - दोन हजार रुपयांच्या नोटेचा रंग जात असल्यानं तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. या अफवेमध्ये कितपत तथ्य आहे याचा रिअॅलिटी चेक मुंबई लाइव्हनं आपल्या खास रिपोर्टमध्ये केला होता. ज्यामध्ये अगदी 5 रूपयांपासून ते थेट 500 रूपयांच्या जुन्या नोटेपर्यंत आणि 2000च्या नवीन नोटेचाही रंग जात असल्याचं समोर आलं. या रिअॅलिटी चेकनंतरच रिझर्व्ह बँकेचे अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. "नोटांचा रंग जाणं ही सामान्य गोष्ट आहे. सगळ्याच नोटांचा रंग जातो. उलट जर नोटांचा रंग जात नसेल तर चिंता करण्याचं कारण आहे. कारण ती नोट बनावट असण्याची शक्यता आहे," असं स्पष्टीकरण दास यांनी दिलंय.

मुंबई लाइव्हनं केलेला रिअॅलिटी चेक पाहा खालच्या लिंकवर

https://mumbailive.maharashtraalive.com/details/news/m/5/3381

पुढील बातमी
इतर बातम्या