CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ, ‘हे’ आहेत नवे दर

महानगर गॅस लिमिटेडने CNGच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात ४ रुपयांची वाढ झाली आहे तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता सीएनजी 80 प्रति किलोने खरेदी करावा लागेल तर पीएनजीच्या दरातही वाढ होऊन तो 48.50 रुपये करण्यात आला आहे.

स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सांगितलं आहे. वाढलेले नवीन दर हे आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत. महानगर गॅस लिमिटेडने यासंबंधी एक पत्रक जारी केलं आहे.

देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजीच्या किमतीत चार रुपये तर पीएनजीच्या किमतीत तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 29 एप्रिलमध्ये वाढलेले होते. त्यावेळी चार रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर टाकली तर त्यात पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड आज प्रति बॅरल 1.38 डॉलरनं घसरल्यानंतर प्रति बॅरल 102.7 डॉलरच्या दरावर आहे. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.21 डॉलरने घसरल्यानंतर प्रति बॅरल 105.9 डॉलरवर आहे.


हेही वाचा

घरपोच इंधन देणार मोबाइल सीएनजी स्टेशन

पुढील बातमी
इतर बातम्या