गोदरेज कामगारांचा लाक्षणिक उपोषण

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

घाटकोपर - गोदरेज कंपनीच्या कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. बुधवारी हे उपोषण करण्यात आलं. कामगारांना सेवा निवृत्तीनंतर मिळणारी कमी ग्रॅच्युईटी, निवृत्तीचे वय ६० वर्षावरून ५८ वर्ष कमी केले. वार्षिक पगार वाढ बंद, महागाई भत्ता बंद, प्रमोशन बंद, किरकोळ रजा बंद, प्रॉव्हिडंट फंडा कमी अशा सर्व मागण्या मान्य करण्यासाठी उपोषण करण्यात आलं.

तसंच काम करताना अपघात झाल्यास सर्व कामगारांच्या पगारातून २५० रुपये कापून कंपनी गिळंकृत करत आहे. कामगारांच्या कामाच्या वेळेत वाढ झाली असून त्यांच्या पगारत मात्र वाढ झालेली नाही. गोदरेजसारख्या प्रतिष्ठित कंपनीत येथील कामगारांची मोठी पिळवणूक होत आहे. कंपनीत नवीन कामगारांची भरती देखील केली जात नाही. जुन्या कामगारांना स्वेच्छा निवृत्ती योजनेत राजीनामा देण्यासाठी कामगारांवर दबाव टाकला जात आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या गोदरेज युनिटचे अध्यक्ष गुरुनाथ भुवड यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या