सोन्याचे दर आकाशाला भिडले

सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किंमती लवकरच ५० हजारांपेक्षा जास्त होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही बाजार तज्ज्ञांनुसार दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ८० हजार रुपये प्रति तोळा होण्याची देखील शक्यता आहे.

मंगळवारी दिल्लीमध्ये २४ कॅरेट म्हणजेच ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव ४८ हजार ९८८ रुपयांवरून कमी होत ४८ हजार ९३१ रुपये प्रति तोळा झाले होते. मंगळवारी ५७ रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. याआधी सोमवारी सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति तोळा ८५ रुपये तर चांदीमध्ये प्रति किलो १४४ रुपयांची घसरण झाली होती.

इतिहासात पहिल्यांदाच सोन्याची किंमत ४९ हजाराच्या घरात पोहोचली आहे. लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीनं असे अनेक रेकॉर्ड रचले आहेत. परिणामी लवकरच सोन्याच्या किंमती ५० हजारांपेक्षा जास्त होण्याची दाट शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या