घरगुती एलपीजी सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, 'या' योजना धारकांना होणार फायदा

केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरवर 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडरची किंमत ही 200 रुपयांनी कमी झाली आहे. हे अनुदान वर्षभरातील 12 सिलेंडरवर देण्यात येणार आहे. ही दरकपात तात्काळ लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे. 

याचा फायदा हा 9 कोटी उज्ज्वला योजना धारकांना होणार आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास 6100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

गुरवारी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली होती तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर आठ रुपयांनी महागला होता. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती या 1000 रुपयांच्या वर गेल्या होत्या.

पुढील बातमी
इतर बातम्या