होंडाची भारतात ऐतिहासिक कामगिरी

दुचाकी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या होंडा कंपनीने गेल्या अडीच वर्षांत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. गेल्या अडीच वर्षांत होंडाने भारतात आपला विस्तार तब्बर दुपटीने वाढवल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

2013-14 ते 2017-18 या काळात होंडाचे 2800 स्टोअर्सपासून 5500 स्टोअर्सपर्यंत नेटवर्क विस्तारले आहे. शिवाय 2800 नवे टच पॉइंट सुरु करणारी होंडा हे भारतातली पहिली कंपनी ठरली आहे.

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता नव्या कारखान्यांमध्ये होंडाकडून 9500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण करणं अधिक सोपं होणार आहे.

मिनोरु कातो, मुख्य कार्यकारी अधिकारी, होंडा

काही वर्षांपूर्वीपर्यंत हिरो आणि होंडा या दोन्ही कंपन्या भागीदारीमध्ये काम करत होत्या. मात्र, काही वर्षांपूर्वीच या दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे व्यवसाय करु लागल्या आहेत.

नेटवर्क विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शहरी व निमशहरी शहरांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले होते. भारतात आखण्यात आलेल्या आक्रमक धोरणात अडीच वर्षांत नेटवर्कची संख्या दुप्पटीने वाढवण्यात आली. यापुढे ग्रामीण आणि निमशहरी भागात 70 टक्के दालने सुरू करण्यात येणार आहेत.


हेही वाचा

4जी नंतर आता 5जी इंटरनेट सेवा मिळणार!

पुढील बातमी
इतर बातम्या