आयकर विभागाचा करदात्यांना अलर्ट, 'अशी' होऊ शकते फसवणूक

आयकर परतावा देण्याचं सांगणाऱ्या बनावट ईमेलबाबत आयकर विभागाने करदात्यांना अलर्ट करून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रिफंड देण्याचे कबूल करणारा कोणताही मेल किंवा मेसेज आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे करदात्यांनी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये असं आयकर विभागाने ट्टिवट करत बनावट ईमेलबाबत पूर्वसूचना दिली आहे.

आयकर विभागाने सांगितलं आहे की, आयकर विभाग कधीही मेलच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती विचारत नाही. तुमचे पिन नंबर, पासवर्ड, क्रेडिट कार्ड संबधित माहिती, बँकेसंदर्भातील माहिती किंवा इतर आर्थिक बाबींशी संबधित माहिती ई-मेलच्या माध्यमातून विचारत नाही. त्यामुळे जर असा कोणताही मेल किंवा मेसेज तुम्हाला आला असेल तर खबरदारी बाळगा. हे फिशींग मेसेज असून आयकर विभागाने ते पाठवलेले नाहीत.  https://incometaxindia.gov.in/Pages/report-phishing.aspx  या लिंकवर दिलेली माहिती देखील काळजीपूर्वक वाचण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाचे संकट लक्षात घेता, सरकारने आयकर विभागाला  लवकरात लवकर करदात्यांना आयटी रिफंड देण्याचे निर्देश दिले होते. ज्यानंतर आयकर विभागाकडून करदात्यांना मेल पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 1.74 लाख प्रकरणात कन्फर्मेशन मेल देखील पाठवण्यात आला आहे. 8 ते 20 एप्रिल या कालावधी दरम्यान जवळपास 9000 कोटींचा रिफंड जारी करण्यात आला होता. यामध्ये 5 लाखां किंमतीपर्यंतच्या 14 लाख रिफंडच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.


हेही वाचा -

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

तर, ११ लाख परप्रांतीयांना सोडण्यासाठी लागतील इतक्या ट्रेन आणि बस..


पुढील बातमी
इतर बातम्या