आता कॅशलेस मेट्रो प्रवास

मुंबई - हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानं नागरिक हैराण झालेत. त्यातही प्रवास खर्चासाठी सुट्टे पैसेच लागत असल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढत आहेत. पण आता मेट्रो प्रवाशांची ही अडचण दूर झाली आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने नोटबाणीच्या धर्तीवर मेट्रो प्रवास कॅशलेस केला आहे. पेटीएम अॅपच्या माध्यमातून मोबाइल व्हॉलेटद्वारे मेट्रो प्रवाशांना आता मेट्रो तिकीटाचे कुपन खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारपासून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं एमएमओपीएलकडून सांगण्यात येत आहे. सिंगल आणि रिटर्न कुपनसाठी ही सेवा असणार असून यासाठी सर्वप्रथम प्रवाशांना पेटीएम अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांनो सुट्टे पैसे विसरा आणि त्वरीत पेटीएम अॅप डाऊनलोड करा.

पुढील बातमी
इतर बातम्या