मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला ५ नोव्हेंबरला मुंबईत

जगद्विख्यात तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला लवकरच मुंबईला भेट देणार आहेत. ५ नोव्हेंबरला सत्या नडेला मुंबईत येणार आहेत. सत्या नडेला यांचं पुस्तक 'हिट रिफ्रेश'च्या प्रमोशनसाठी ते मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

सत्या नडेला ५ नोव्हेंबरला मुंबईत दाखल होणार आहेत. ६ आणि ७ नोव्हेंबरला ते भारताच्या दौऱ्यावर असतील. मुंबईसोबतच ते हैदराबाद आणि दिल्लीला देखील भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सरकारी अधिकारी, व्यवसायिक आणि विद्यार्थी यांची भेट घेणार आहेत.

भारतीय वंशाचे मायस्क्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचे 'हिट रिफ्रेश' हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतात सुद्धा लवकरच हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. हे पुस्तक तीन भाषांमध्ये म्हणजेच हिंदी, तेलुगु आणि तमिळमध्ये उपलब्ध होणार आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 'हिट रिफ्रेश' या पुस्तकात समाज कशाप्रकारे बदलत आहे, यावर भाष्य करण्यात आलं आहे.

हैदराबादमध्ये जन्म झालेले सत्या नडेला फेब्रुवारी २൦१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले. त्यांचे हे पुस्तक सप्टेंबरमध्ये बाजारात आले आणि त्याची विक्रीही जोरदार सुरु आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या