मुंबै बॅंक एक पाऊल पुढे !

मुंबई - मुंबै बँकेने आधुनिकतेकडे एक पाऊल पुढे टाकत डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त असल्याचा दावा बॅंकेने केला आहे.

"शहरातील ४० हजार गृहनिर्माण संस्थांना ही सेवा पुरवण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. यासाठी संबंधित गृहनिर्माण संस्थेला बँकेतर्फे एक संगणक प्रणालीही देण्यात येईल. ही प्रणाली क्लाऊड आधारित असल्याने संस्थेची माहिती तिच्या सभासदांना सहजगत्या पाहता येईल", अशी माहिती मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

या सेवेचा वापर करून सहकारी गृहनिर्माण संस्थांना दैनंदिन अकाऊंटिंग, मासिक देखभाल, धनादेश गोळा करणे या कामांपासून सर्व सभासदांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना गृहनिर्माण संस्थेची माहिती देणे शक्य होणार आहे. डोअर स्टेप बँकिंगमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना आपला कारभार ऑनलाइन करणे शक्य होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या