जुन्या नोटांनी कर भरण्याचा आज अखेरचा दिवस

मुंबई - वीजबिल, मालमत्ता कर, पाणीबिल... यापैकी काहीचा भरणा करायचा राहिलाय का? तर मग आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण हा भरणा करण्यासाठी चलनातून काढून घेतलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत आज संपणार आहे. पेट्रोल पंपांवरही या नोटा मुदतवाढ मिळाली नाही, तर आजनंतर चालणार नाहीयेत. अर्थात, गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता ही मुदत संपली तरी घाबरून जायचं कारण नाही. कारण 30 डिसेंबरपर्यंत कुठल्याही बँकेतून तुम्हाला या नोटा बदलून घेता येतील किंवा तुमच्या खात्यात जमाही करता येतील.

नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र तसंच राज्य सरकारनं सरकारी कार्यालयांत जुन्या नोटा स्वीकारल्या जातील हे स्पष्ट केलं होतं. ही मुदत वाढवून मग 24 नोव्हेंबर करण्यात आली होती. तसंच चलन तुटवड्यामुळे सुट्ट्या पैशांवरुन होणाऱ्या वादांमुळे 24 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीही करण्यात आली होती. हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, औषधांची दुकानं या ठिकाणीही जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या