सलग अकराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग अकराव्या दिवशी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल २५ पैशांनी महागले असून ते ९७ रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईत डिझेल प्रति लिटर ८८ रुपयांना मिळत आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर ३१ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत आता पेट्रोल ९०.१९ पैशांना तर डिझेल ८६.६०  रुपयांना मिळत आहे.कोलकातामध्ये पेट्रोल ९१.४१  आणि डिझेल ८४.१९ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९२.२५ आणि ८५.६३ आहेत.

 केंद्र सरकार सध्या पेट्रोलवर ३२.९० रुपये एक्साइज कर लावत आहे. सध्यातरी या करामध्ये कोणतीही कपात करण्याचा विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. देशातील इतर राज्यांपैकी राजस्थानमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. मध्य प्रदेशातील अनूपपुरात पेट्रोल १०० पैशांना २५ पैसे तर डिझेल ९०.३५ रुपयांना विकले जात आहे. राजस्थानात पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक कर आहे.

दरम्यान, मेघालयात पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर सात रुपयांनी स्वस्त झाले आहेत. राज्यातील व्यावसायिक वाहन चालकांनी संप केल्यावर पेट्रोलियम इंधनावरील व्हॅट कमी करण्यात आला. मेघालय सरकारने मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केल्यामुळे राज्यात या पेट्रोलियम इंधनाच्या दरात प्रति लिटर पाच रुपयांपेक्षा कमी कपात केली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या