'वाढता वाढता वाढे' असंच काहीसं पेट्रोल अाणि डिझेलच्या बाबतीत घडत अाहे. जीएसटीत समावेश करण्यात न अालेल्या पेट्रोल अाणि डिझेलचे दर मात्र दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले अाहेत. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीने ८०चा अाकडा पार केला. त्यावेळी डिझेलचा एक लिटरचा दर ६७ रुपये इतका होता. सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८०.०८ रुपये इतकं होतं.
विशेष म्हणजे, भाजप सरकारच्या काळात डिझेलवरील उत्पादन शुल्क ३८० टक्क्यांनी वाढलं अाहे. त्याचबरोबर पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातही १२० टक्क्यांची वाढ झाली अाहे. साडेतीन वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ३.५६ टक्क्यांनी वाढून १७.३३ रुपये प्रति लिटर एवढा झाला अाहे. ज्यामुळे पेट्रोलच्या किंमती वाढतच चालल्या अाहेत.
केंद्र सरकार सद्यस्थितीला पेट्रोल अाणि डिझेलवरील अबकारी करात कपात करण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. मात्र महागाई नियंत्रणात अाणण्यासाठी केंद्र सरकारनं विविध राज्य सरकारला वॅटमध्ये कपात करण्याची शिफारस केली अाहे.