पेट्रोलचे दर वाढवण्याची कंपन्यांची केंद्राकडे मागणी

येत्या काही दिवसांत मुंबईसह देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. इंडियन ऑइल कंपनीने याबाबत पुढाकार घेतला असून, पेट्रोल दरांत १२ ते १७ रुपये वाढ करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.

रशिया-युक्रेनमधील तणावामुळं जागतिक बाजारात कच्चे तेल महागले आहे. किमती आंतरराष्ट्रीय बाजारात १३० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. देशांतर्गत तेल कंपन्यांना ही बाब ध्यानात घेऊन इंधनदरांचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

पुढील बातमी
इतर बातम्या