पेट्रोलपंपचालकांचा संप मागे

मुंबई - पेट्रोल पंप चालकांनी दोन दिवस पुकारलेलं ‘इंधन खरेदी बंद’ आंदोलन मागे घेतलंय. पेट्रोल पंप चालकांना डिझेलमध्ये १० पैसे तर पेट्रोलमध्ये १३.८ पैसे कमिशन वाढवून देण्याचं तेल कंपन्यांनी मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तेल वितरक आणि पेट्रोलपंप चालकांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तसा लेखी करार देखील करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या