'श्रम केल्यास चर्मोद्योग वाढेल'

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

दादर - शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीने समाजातील बांधवांचा सर्वांगिण विकास व्हावा, आणि समस्या जाणून त्यावर योग्य तो मार्ग काढता यावा, यासाठी मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. मयूर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथील संत रोहीदास भवन कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीस शासकीय चर्मकला महाविद्यालयाचे चर्मतज्ञ अधिक्षक विलास चौधरी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना चर्मकला व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन आपल्याला भविष्यात यशस्वी कसे होता येईल. यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी भास्कर गद्रे, भटु अहिरे, सीमा लोकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या