सीआरपीएफमध्ये २४३९ पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 2439 पदं भरली जाणार आहेत. देशभरातील विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. 

या पदांसाठी उमेदवार 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या मुलाखतीत थेट उपस्थित राहू शकतात. अधिकृत वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांचे अर्ज स्वरूप (CRPF भर्ती 2021) पाहू शकतात. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) कंत्राटी तत्त्वावर विविध सीएपीएफ रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

मुलाखतीद्वारे निवड

पात्र आणि इच्छुक उमेदवार सीआरपीएफ पॅरामेडिकल स्टाफच्या भरतीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या दिनांकाला आणि वेळेला मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ आणि संबंधित कागदपत्रे त्यांच्या फोटोकॉपीसह (सेवानिवृत्ती प्रमाणपत्र/पीपीओ, पदवी, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्र इ.) सोबत ठेवणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, उमेदवारांना सर्व माहितीसह अर्ज साध्या कागदावर लिहून सादर करावा लागेल. अर्ज केलेल्या पदाचे नाव अर्जात भरावे लागेल. अर्जासोबत अलीकडील 3 फोटो सोबत ठेवावे लागतील.

पदांचा तपशील

आसाम रायफल्स (AR) – 156

सीमा सुरक्षा दल (BSF)- 365

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) – 1537

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP)- 130

सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) – 251

पात्रता

सीएपीएफ, एआर आणि सशस्त्र सेना निवृत्त उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहितीसाठी, आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

निवड प्रक्रिया

केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अशा परिस्थितीत, जे उमेदवार त्यात अर्ज करतील त्यांना 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या मुलाखतीत उपस्थित राहावे लागेल.

जाहिरात (Notification) PDF

पुढील बातमी
इतर बातम्या