मध्यप्रेमींना झटका; बीअरच्या किमती वाढणार?

नियमीत बीअर पिणाऱ्या मध्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धाचा जगाच्या राजकारणालाच नाही तर अर्थकारणालाही फटका बसणार आहे. या युद्धामुळे अनेक उद्योगांसमोरील आव्हानांत भर पडत आहे. अशातच आता मद्यप्रेमींच्या तोंडचे पाणी पळणार आहे. रशिया आणि युक्रेनमधून होणाऱ्या जवच्या पुरवठ्याला फटका बसणार आहे. त्यामुळं जवपासून बनणाऱ्या बिअरच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशिया व युक्रेन हे दोन्ही देश जव उत्पादनात आघाडीवर असल्यानं त्यांच्यातील युद्धामुळं जगभरात जवचा तुटवडा निर्माण होणार आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर बिअर जवपासून तयार केली जाते. रशियात जवचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. येथील जवचे वार्षिक उत्पादन १.८ कोटी टनच्या आसपास आहे.

युक्रेन जवच्या उत्पादनात चौथ्या स्थानावर असून येथे जवळपास ९५ लाख टन इतके जवचे उत्पादन घेतले जाते. हिंदुस्थानात जवचे उत्पादन १६ ते १७ लाख टनच्या आसपास आहे. रशिया व युक्रेन या आघाडीच्या जव उत्पादक देशांत युद्ध सुरू झाल्याने बिअरच्या किमतीवर मोठा परिणाम होणार आहे.

मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार, जगातील बहुतांश बिअर जवपासून बनवल्या जातात. कच्च्या मालाच्या खर्चात जवचे प्रमाण ३० टक्के आहे, तर जगातील सुमारे 18 टक्के जवची निर्यात युक्रेनमधून केली जाते.

जगातील 90 टक्के माल्ट उत्पादन जवपासून होते. माल्टपासून अल्कोहोलयुक्त पेये तयार केली जातात. अनेक शीतपेय कंपन्या फेब्रुवारी-मार्चमध्ये मोठय़ा प्रमाणात जव खरेदी करतात. याचदरम्यान युद्ध भडकले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या