एसबीआयचं कर्ज स्वस्त

स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) आपल्या कर्जावरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने एमसीएलआर दर ०.१० टक्क्यांने कमी केला आहे. हे नवीन दर १०  जुलैपासून लागू होणार आहेत. व्याजदरात कपात केल्यामुळे एसबीआयचे गृह, वाहन आणि इतर कर्जे स्वस्त होणार आहेत. 

एसबीआयने तीन महिन्यांपर्यंत मुदत असलेल्या अल्प कालावधीच्या कर्जाचा दर ०.०५ टक्के ०.१० टक्के कपात केली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठीचा एमसीएलआर दर ६.६५ टक्के झाला आहे. सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर दर ६.९५ टक्के आहे. १ वर्षासाठी ७ टक्के, दोन वर्षांसाठी ७. २० टक्के आणि ३ वर्षांसाठी ७.३ टक्के आहे. बँकेचा बेस रेट ७.४० टक्के आहे. 

जूनमध्ये देखील एसबीआयने व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयने २२ मे रोजी रेपो रेटमध्ये ०.४० टक्क्यांची कपात करून ते ४ टक्क्यांवर आणले होते. यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि यूको बँकेने रेपो आणि एमसीएलआर संबधित दर आधीच कमी केले होते. 


पुढील बातमी
इतर बातम्या