खिशाला झळ किती? मोबाईल, टीव्ही महाग, काजू स्वस्त

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • व्यवसाय

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न विचारण्यात येतो, तो म्हणजे कुठल्या वस्तू महागल्या अन् कुठल्या स्वस्त झाल्या? कारण ठराविक श्रेणीतील वस्तूंवरील शुल्क वाढवल्यावर किंवा कमी केल्यावर त्यांच्या किमतीतही मोठे फेरबदल होतात. त्याचा सहाजिकच थेट परिणाम होतो, तो सर्वसामान्यांच्या खिशावर.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सीमा शुल्कात वाढ केली आहे. मोबाईल सीमाशुल्क १५ टक्क्यांवरून २० टक्के केला आहे. त्यामुळे मोबाईलसोबतच कार मोटरसायकलसहित फूटवेअरपर्यंत वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहेत. यामुळे आयात वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

तर, कच्च्या काजूवरील सीमाशुल्क ५ टक्क्यांवरून २.५ टक्के करण्यात आल्याने कच्चा काजू, सौरऊर्जा उत्पादने स्वस्त होणार आहेत. नजर टाकूया, कुठल्या वस्तू स्वस्त होणार अाणि महागणार यावर...

कुठल्या वस्तू महाग?

कार आणि मोटरसायकल

मोबाईल फोन

सोनं-चांदी

डायमंड, खडे

इमिटेशन ज्वेलरी

भाज्या, फळांचा रस

सनग्लास

घड्याळे

सौंदर्यप्रसाधने

परफ्युम्स, डिओ, साबण, पावडर

ट्रक, बस रेडिअल टायर

सिल्क फॅब्रिक

बूट, चपला

एलईडी/एलसीडी टिव्ही

फर्निचर

मॅट्रस

लॅम्प

व्हिडिओ गेम्स

इडेबल/ व्हेजिटेबल आॅईल

काय स्वस्त?

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने इंधन २ रुपयांनी स्वस्त

कच्चा काजू

सौरऊर्जा उत्पादने

पुढील बातमी
इतर बातम्या