आता भाजीमार्केटही मंदीत

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • व्यवसाय

लोअर परळ - नोटबंदीची झळ मुंबईकरांना चांगलीच लागलीय. त्याचाच काहीसा प्रत्ययं गिरणगावं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोअर परळच्या भाजी मार्केटमध्ये येतोय. या भाजी मार्केटमध्ये कमी दरात आणि चांगल्या प्रतीची भाजी नेहमी उपलब्ध असल्यानं कामगार घरी परतताना इथूनच भाजीपाला खरेदी करतात. पण ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चालनातून रद्द झाल्यानं या मार्केटमध्ये मंदी सुरू आहे. ग्राहकांची होणारी गर्दी निम्म्याहून कमी झाली आहे. एरव्ही थंडी सुरू झाली की पालेभाज्या, मटर, ढोपळी मिरची यांसारख्या भाज्यांनी बाजार फुलून जातो. मात्र सुट्या पैशांअभावी माल खरेदी करण्यासाठी ग्राहक नसल्याचं अक्षय हिंदळेकर या भाजी विक्रेत्यानं मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या