वर्ल्ड ट्रेंड सेंटरची जागा ताब्यात घेण्याचे आदेश

मुंबई - कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेंड सेंटरची जागा ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी यासंदर्भात नोटीस पाठविली आहे. या नोटीसमुळे वर्ल्ड ट्रेंड सेंटरची सुमारे 48,025 स्क्वेअर मीटर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये पोटभाडेकरू ठेवणे, परस्पर गाळे विकणे, 2012 पासून राज्य सरकारचे सुमारे 20 कोटी रुपयांचे भाडे थकवणे अशा अनेक गोष्टींमध्ये अनियमितता आढळल्यानं राज्य सरकारनं ही कारवाई केली आहे. 1970 साली राज्य सरकारकडून एम विश्वेश्ववरय्या इंडस्ट्रीयल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरला भाडेपट्याने ही जागा देण्यात आली होती. या नोटीस संदर्भात वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उपाध्यक्ष विजय कलंत्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या अगोदरही ठाणे जिल्हाधिकारी असताना अश्विनी जोशी यांनी ठाण्यातील रेती माफियांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या