EMI महागला, आरबीआयकडून रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अखेर रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत आरबीआयचे पतधोरण (RBI policy) जाहीर केले.

आरबीआयने रेपो दरात 50 बीपीएस पॉईंट म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. आरबीआयच्या व्याज दरवाढीनंतर आता व्याज दर 5.90 टक्के इतका झाला आहे.

ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते.


पुढील बातमी
इतर बातम्या