मालमत्ता करार, भाडेकरार, वारसा हक्कपत्र यासह इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांची नोंदणी आता मुंबईतील (mumbai) सहा जिल्हाधिकारी कार्यालयात कुठेही करणे शक्य होणार आहे.
महसूल विभागाने (Revenue Department) दस्त नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करत मुंबईतील क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द केली आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांची धावपळ व वेळेची बचत होणार आहे.
मुंबई शहर, अंधेरी (andheri), कुर्ला, बोरिवली (borivali) आणि ओल्ड कस्टम हाऊसजवळील (old custom house) प्रधान मुद्रांक कार्यालयातील जिल्हाधिकारी या 6 कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी दस्त नोंदणी करता येणार आहे.
आधी ज्या भागात व्यक्ती किंवा व्यवसाय होता अथवा आहे त्या भागातीलच कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक होते, पण आता ती अट काढून टाकण्यात आली आहे.
आतापर्यंत क्षेत्रीय अटीमुळे लोकांना दूरच्या कार्यालयात जाणे, रांगेत उभे राहणे तसेच उशीरापर्यंत वेळ खर्च करणे इ. त्रासाला सामोरे जावे लागत होते.
परंतु आता नागरिकांना आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. महसूल विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत राजपत्र जारी केले आहे.
याबाबत प्रशासनाकडून सुधारणा तत्काळ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच ही सुविधा नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
जमीन मोजणीसाठी सध्या 90 दिवस ते 160 दिवस लागायचे. आता जमीन मोजणी 30 दिवसांत पूर्ण होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे.
हेही वाचा