'इतक्या' मुंबईकरांनी केल्या घरी रॅपिड अॅण्टिजेन चाचण्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घरी चाचण्या करणारे अनेक मुंबईकर निदान अहवालाची माहिती देत नसल्याने पालिका प्रशासनाने औषध विक्रेते आणि एफडीए यंत्रणेला रॅपिड अॅण्टिजेन चाचण्यांचे किट विकत घेणाऱ्यांची पूर्ण माहिती पालिकेकडे नोंदवावी, असे निर्देश दिले होते. 

१० दिवसांमध्ये १ लाख २८ हजार ८१८ जणांनी घरी अॅण्टिजेन रॅपिड किटच्या सहाय्याने चाचण्या केल्या असून, त्यापैकी ४४९७ रुग्ण कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे घरगुती स्वरूपामध्ये विलगीकरणामध्ये किती रुग्ण आहेत, कोणाला सौम्य वा तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत, याची नोंद ठेवणे पालिका प्रशासानाला सोपे सहज होणार आहे.

मुंबईमध्ये लक्षणे नसलेले रुग्ण अनेकदा चाचणी करत नाहीत. तसेच काही मुंबईकर घरी चाचण्या करून त्यांची माहिती संबधित यंत्रणेला देत नाहीत. त्यामुळे किती जणांना करोना झाला, याची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. 

लक्षणे नसलेले व नोंदणी न केलेल्या रुग्णांचे अहवाल अपलोड केले जात नाहीत. त्यामुळे संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता वाढते. हे रुग्ण सुपरस्प्रेडर ठरू शकतात. अशा रुग्णांची योग्यवेळी चाचणी करून त्यांची वैद्यकीय स्थिती जाणून घेणे गरजेचे असते. 

पालिकेच्या या निर्देशामुळे घरगुती स्वरूपामध्ये चाचण्या केलेल्या रुग्णांची नोंद यंत्रणेकडे वेळेवर करणे शक्य झाल्याचा विश्वास वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पुढील बातमी
इतर बातम्या