मुंबईत बुधवारी १ हजार १४४ नवे करोनाबाधित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहेत. बुधवारी मुंबईत १ हजार १४४ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ७८ हजार ५९० वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत २ लाख ५३ हजार ६०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच, १० हजार ७२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील अॅक्टिव्ह केससची संख्या ११ हजार १०१ आहे. बुधवारी मुंबईत ७०१ जण कोरोनातून बरे झाले. शिवाय, राज्यात ६ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये राज्यात ४ हजार ८४४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्यस्थितीत ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रातल्या सीमांवर तपासणी करण्यात येते आहे. दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या ४ राज्यातून येणाऱ्यांचीही चाचणी होते आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या