तसेच त्यामुळे विरार-चर्चगेट (churchgate) मार्गावरील 16 लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढणार आहे. सध्या उपनगरीय रेल्वेवर 15 डब्यांच्या एकूण 211लोकल फेऱ्या सुरू आहेत.
गुरूवारपासून लोकल फेऱ्यांची संख्या 227 होणार आहे. तर एकूण फेऱ्यांची संख्या 1414 राहणार आहे.
विरार (virar) -चर्चगेट-डहाणू मार्गावर लोकलला नेहमीच गर्दी असते. पीक अव्हरदरम्यान प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून लोकलच्या दरवाज्यावर लटकून प्रवास करावा लागतो.
सध्या सुरू असलेल्या 15 डब्यांच्या लोकलची वारंवारता कमी असल्यामुळे नागरिकांना त्याचा फारसा फायदा होत नव्हता. परंतु, या वाढीव लोकल फेऱ्यांमुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
या 16 फेऱ्यांपैकी 8 लोकल फेऱ्या गर्दीच्या वेळेत विरार-चर्चगेट मार्गावर धावतील. सकाळी चर्चगेट ते विरार, बोरिवली 4 लोकल फेऱ्या असतील तर संध्याकाळी विरार, बोरिवली ते चर्चगेट 4 लोकल फेऱ्या असतील.
इतर 8 फेऱ्या दिवसभर चर्चगेट-विरार, दादर-बोरिवली, आणि नालासोपारा-चर्चगेट या मार्गांवर धावतील. यामुळे पश्चिम रेल्वेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.
चेन्नई (chennai) येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF)कडून नुकतीच या 15 डब्यांच्या लोकलची निर्मिती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या लोकल पश्चिम रेल्वेच्या विरार कारशेडमध्ये दाखल झाल्या होत्या.
तसेच तेव्हापासून या लोकलची चाचणी सुरू होती. यशस्वी चाचण्यांनंतर आता 19 मार्चपासून या लोकल फेऱ्या प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सध्या पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेवरही 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या एकूण 36 रेल्वे स्थानकांवर फलाट लांबणीचं काम सुरू आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे रेल्वे स्थानकांवरील फलाट लांबणीचं काम सुरू आहे.
हेही वाचा