मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, राज्यात मागील पाच दिवसात कोरोनाने 502 जणांचा बळी घेतला आहे. आज कोरोनाचे 99 जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात 1510 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात 54 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38 रुग्ण दगावले आहेत. तर 27 मे रोजी 32 मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी 28 मे रोजी रोजी एकूण 38 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, शनिवारी मुंबईत कोरोनाचे 1510 नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता 38 हजार 220 इतकी झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात करोनाचे 356 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 16 हजार 364 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती
अतिदक्षता विभागातील(ICU) व्यवस्था - 645
व्हेंटिलेटरवर व्यवस्था- 373
सीसीसी 2 मधील व्यवस्था - 29740
डायलसिस उपकरणे - 92
मुंबईतील कंटेनमेंट झोनची माहिती
कंटेनमेंट झोन (चाळ आणि झोपडपट्टी) - 700
सीलबंद इमारती - 3110
अती जोखीम - 8864
कमी जोखीम 18, 861
सीसीसी 1 मधील अति जोखीम संपर्क - 59, 193
एकूण कोविड चाचण्या - 1 लाख 89 हजार 967