1 जुलैला साजरा होणार 'राज्य मतदार दिन'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

येत्या 1 जुलैपासून दरवर्षी महाराष्ट्रात राज्य मतदार दिन साजरा करण्यात येईल. 'स्वीप' कार्यक्रमाअंतर्गत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने देशातील लोकशाही बळकट व्हावी, मतदारांमध्ये जागरूकता यावी, मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने 'स्वीप' (SVEEP - Systematic Voters' Education and Electoral Participation) हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

दरवर्षी 1 जुलैला राज्य मतदान दिन साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यावर सरकारने सोपवली आहे. 'स्वीप' कार्यक्रम केवळ राष्ट्रीय मतदान दिनापुरता मर्यादित न राहता राज्य मतदार दिवस आणि जिल्हा मतदार दिवस या माध्यमातून मतदारांना जागृत करण्याचे काम वर्षभर सुरु राहावे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या