आम्हाला कधी मिळणार घर?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूर - मुंबई शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पातील एक म्हणजे इस्टर्न फ्री-वे. हा मार्ग तयार होऊन तीन वर्ष उलटले. मात्र अनेक बाधिक कुटुंबियांना एमएमआरडीएकडून अजूनही घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे या कुटुंबियांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहे. मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरातील वाहतूक कोंडीला सामोर न जाता तात्काळ दक्षिण मुंबईत पोहचता यावे, याकरता एमएमआरडीएने इस्टर्न फ्रीवे हा मार्ग तयार केला. यामध्ये सुमारे सात हजार झोपड्या बाधित करण्यात आल्या होत्या. या सर्व झोपड्यांचे एमएमआरडीए पुनर्वसन करेल असे अश्वासन इथल्या झोपडीधारकांना देण्यात आले होते. मात्र एमएमआरडीएने या प्रकल्पातील केवळ पाच हजार झोपड्यांचे पाजंरापोळ, मानखुर्द लल्लूभाई कंपाउंड आणि गोवंडी परिसरात पुनर्वसन केले. तरीही यातील अनेक झोपडीधारक आद्यापही घराच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत अनेकदा अंदोलन करूनही एमएमआरडीए मार्ग काढत नसल्याने पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचे झोपडपट्टीवासियांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या