अंधेरीतील 'त्या' इमारतीत २२ जणांना कोरोनाचा संसर्ग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून अंधेरी येथील एक इमारतीत कोरोनाचे २२ रुग्ण अढळल्याची माहिती समोर येत आहे. अंधेरी पश्चिम येथील जे. पी. रस्त्यावरील विनायक टॉवर या इमारतीत करोनाचे २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही इमारत १४ दिवसांसाठी सील केली आहे. 

राज्य शासनानं सुरू केलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानाच्या सर्वेक्षणादरम्यान पाहणी करण्यात आली. यात इमारतीत विनायक टॉवरमध्ये करोनाचे ३ रुग्ण आढळले होते. 

इमारतीत आणखी रुग्ण असण्याची शक्यता होती. परिणामी पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागामार्फत इमारतीत कोरोना चाचणी शिबीर राबविण्यात आले होते.

इमारतीतील ४० लोकांची अँटीजन चाचणी करण्यात आली. त्यातील १९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळं महापालिकेने इमारत १४ दिवसांसाठी सील केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या