दहिसर, सांताक्रूजमध्ये २०० मिमीहुन अधिक पावसाची नोंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहिसरमध्ये २४९ मिमी, तर सांताक्रूजमध्ये २१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो.

रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली. या पावसामुळे दहिसर नदीचं पाणी बोरीवली पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. ते देखील ओसरू लागलं आहे. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबईची वाहतूक सेवाही ठप्प झाली. तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्यानं चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागलं. शिवाय, रस्ते वाहतूकही खोळंबली असल्यानं तसंच, गुडघाभर पाणी साचल्यानं पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या